समन्वय बद्दल

     आयुक्त, आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था, पुणे हे आठ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे अध्यक्ष असून शासनाने त्यांना या तपासणी समितीचे "समन्वय अधिकारी " म्हणून  घोषित केले आहे.  अनुसूचित जमाती  प्रमाणपत्र  तपासणी  समित्यांची  कार्यालये  पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नंदुरबार, अमरावती, नागपूर  व  गडचिरोली  येथे निर्माण  करण्यात  आलेली  असून  या समित्यांच्या नियंत्रणाचे कामकाज समन्वय कक्षामार्फत चालते. या कक्षाकडून शासनास समित्यांनी निकाली काढलेल्या प्रकरणांचा दैनिक, साप्ताहिक, मासिक, सहामाही व वार्षिक  अहवाल  सादर करण्यात येतो. समितीच्या कामकाजाचा नियमित  आढावा  या कक्षा मार्फत  आयुक्त  घेत असतात.  

     या कक्षांतर्गत स्वतंत्र "विधी कक्षा" ची निर्मिती करण्यात आलेली आहे. या कक्षामार्फत समितीने दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या  न्यायालयीन  प्रकरणांचे  कामकाज पाहिले जाते. तसेच  आयुक्त, आदिवासी  संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांना ज्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये प्रतिवादी करण्यात आले आहे अशी प्रकरणे या कक्षामार्फत हाताळली जातात .