ग्रंथालयाविषयी

          ग्रंथालय, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय). शासन निर्णय, शिक्षण व समाज कल्याण विभाग क्रमांक BCP-1063/M दि.03/05/1962 अन्वये आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथे स्थापन करण्यात आली. सन 1979 पासून संस्थेचे ग्रंथालय महाराष्ट्र राज्यातील विविध आदिवासी जमाती तसेच देशातील अन्य राज्यामध्ये असणाऱ्या अनुसूचित जमाती संबंधाने व त्यांच्या संस्कृतीच्या अनुषंगाने संशोधक व संदर्भात्मक अभ्यासाकरिता सुरू करण्यात आले आहे. संस्थेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ती पुस्तके उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुसज्ज व वाचनसाहित्याने समृद्ध अशा ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली आहे.

          ग्रंथालयात आजमितीस विविध विषयांवरील सुमारे 21 हजार पुस्तके उपलब्ध आहेत. ग्रंथसंग्रहाचा लाभ संस्थेतील संशोधन अधिकारी व आदिवासी क्षेत्रातील संशोधकांना होत आहे. संशोधन अहवाल, मूल्यांकन अहवाल, मानवशास्त्रीय अहवाल, जिल्हा गॅझेटिअर, जनगणना निर्देश ग्रंथ (Census of India), ज्ञानकोश, विश्वकोश, संस्कृतिकोश, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, कायदा, ध्वनीचित्रफित, आदिवासी जीवनाशी निगडीत असलेला समृद्ध ग्रंथसंग्रह ग्रंथालयात उपलब्ध आहे. जात-प्रमाणपत्र पडताळणीसाठी, त्यादृष्टिने तयार करावयाच्या अहवालासाठी तसेच जाती, परंपरा, रूढी, चालीरिती रिवाज यांचा अभ्यास करण्यासाठी ग्रंथालयाचा उपयोग होतो. विविध महत्वपूर्ण विषयांवरील ग्रंथसाहित्याने समृद्ध असे ग्रंथालय संशोधक व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. आजतागायत 1487 वाचक व विद्यार्थ्यांनी ग्रंथालय सेवेचा लाभ घेतला आहे. ग्रंथालयातील वाचन साहित्याचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून ग्रंथालय संगणकीकृत व आधुनिक सोई-सुविधांसह अद्ययावत करण्याचे काम सध्या सुरू आहे. संस्थेच्या लायब्ररीमध्ये जवळजवळ 21000 पुस्तकांचा समृद्ध संग्रह आहे, ज्यात खालील विषयांचा पुस्तकाचा समावेश आहे:

 • आदिवासी संबंधित अभ्यास, समस्या, योजना
 • अर्थशास्त्र
 • मानववंशशास्त्र
 • संशोधन
 • राजकीय-सामाजिक विज्ञान
 • साहित्य
 • कायदा आणि न्याय
 • संदर्भ पुस्तके
 • दुर्मिळ पुस्तके
 • AV साहित्य
 • सरकारी कागदपत्रे: नियम, वार्षिक अहवाल, नियमावली, हस्तपुस्तिका आणि विविध समिती अहवाल. राज्य गझेट्स, etc.

          या ग्रंथालयामध्ये इंग्रजी आणि मराठी कादंबर्या तसेच जीवनी इ. मधील शीर्षकांचे चांगले संकलन आहे. तसेच आमच्याकडे आदिवासी संशोधन शिष्यवृत्ती धारक पीएचडी, एम. फिल यांचा समावेश आहे. ग्रंथालय लोकप्रिय मासिके, जर्नल्स आणि दैनिक वृत्तपत्रांची सदस्यता घेते. वर्ष 2018 पासून लायब्ररी स्वयंचलितरित्या ओपेक उपलब्ध आहे


 

 • ग्रंथालयाकडून दिल्या जाणाऱ्या सेवा :
 1. Online Public Access Catalogue (OPAC) http://eg4.nic.in/ATI/OPAC/Default.aspx या लिंकवर उपलब्ध.
 2. E-Granthalaya 0 Online software
 3. Book Issue-Return for staff
 4. Periodicals
 5. Reference service
 6. Bibliographical service
 7. Newspaper Clipping Service
 8. Referral Services
 9. Current Awareness Services
 10. Article indexing service
 11. Online search of library database
 12. Audio visual and Internet facility

प्रकाशने :

 ग्रंथालय आणि प्रकाशन  विभागाकडून आदिवासी संशोधन पत्रिकेचे वर्षातून दोन वेळा प्रकाशन केले जाते.तसेच आदिवासी संस्कृती, भाषा, सण इत्यादींशी संबंधित विविध पुस्तके देखील प्रकाशित केली जातात.


 ग्रंथालय सुविधांबाबत प्रतिसाद सेवा : ग्रंथालयाकडून दिल्या जाणाऱ्या सेवांबाबत वाचकांचा प्रतिसाद कसा आहे, त्यांच्या सूचना, सेवांबाबत त्यांचे अभिप्राय इ. बाबींसाठी फॉर्म भरून घेतल्यास ग्रंथालयातील सेवामध्ये सुधारणा करण्याविषयी वाव मिळेल.

ग्रंथालयाची वैशिष्टे

 1. सर्व विषयांवरील पुस्तकांचा समावेश
 2. मुक्तद्वारपद्धत (Open Access)
 3. वाचकांकडून ग्रंथालयाला सप्रेम भेट दिलेल्या पुस्तकांचा समावेश नियमित, नव्याने समाविष्ट होणाऱ्या पुस्तकांमध्ये केला जातो.
 4. नवीन पुस्तकांची वाचकांच्या सोईसाठी स्वतंत्र मांडणी.

 

कामाचे तास:

सोमवार ते शुक्रवार, शनिवार (1st, 3rd, 5th) 10.00 am to 6.00 pm
(रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या, 2 रा आणि 4 था शनिवारी बंद)

ग्रंथालयाचा सदस्य होण्यासाठी, पीडीएफ फॉर्म डाउनलोड करा आणि भरा. ग्रंथालयात भरलेले फॉर्म 2 छायाचित्रे व दस्तऐवजांसह सादर करावे (पॅन + आधार कॉपी).